आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.
विषय आहे #अक्षयतृतीया
#अक्षयतृतीया1
अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
वैशाख महिना हा मराठी महिन्यांतील दुसरा महिना. या वेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते. त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवर पडलेला दुसतो, म्हणून या महिन्याला वैशाख वानवा असंही म्हणतात. त्यामुळे थंड पाणी पिणे, थंड पाण्याने अंघोळ करणे आल्हाददायक वाटते.
या महिन्यात महत्वाचे सण व उत्सव येतात. त्यात अक्षय तृतीया हा मोठा सण येतो. तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजे जे सतत राहते ते. म्हणून या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते अशी आपली धारणा आहे. या मुहूर्तावर शेतकरी कामास सुरुवात करतो