Type Here to Get Search Results !

Nice Story about Bird And Sea ( सल्ले नकोत साथ द्या )

0

एकदा एक पक्षी चोचीने समुद्रातील पाणी बाहेर काढत होता.   
दुसऱ्या पक्षाने विचारलं - भाऊ तू हे काय करतो आहेस ?  
पहिला पक्षी बोलला- या समुद्राने माझी पिल्लं बुडवलीत. आता तर मी या समुद्राला सुकवूनच टाकतो.‌

हे ऐकून दुसरा पक्षी बोलला- अरे भावड्या तुझ्याकडनं कसा काय सुकेल समुद्र ? तू एवढासा जीव अन् समुद्र एवढा विशाल. तुझं तर संपूर्ण आयुष्य अपूरे पडेल यासाठी.

तर पहिला पक्षी बोलला - दादा! द्यायची तर साथ दे, फक्त सल्ले नकोत.

हे ऐकून दुसरा पक्षी पण साथ द्यायला लागला. असे हजारो पक्षी येत गेले व दुसऱ्यांना सांगत गेले की , सल्ले नकोत साथ पाहिजे.

हे पाहून  विष्णुदेवाचं वाहन गरुड पण ह्या कामासाठी जायला निघाला.

विष्णु देव म्हणाले अरे तू कुठे चाललास ? तू गेलास तर माझं काम खोळंबेल. अन् तसंही तुम्हा सर्व पक्ष्यांकडून समुद्र काही सुकला पण जाणार नाहीये.

गरुड बोलला - देवा सल्ला नको साथ द्या.

मग काय, हे  ऐकून विष्णुदेव पण समुद्र सुकवायसाठी पुढे आले. विष्णु देवाला पाहून समुद्र घाबरला आणि त्याने त्या पक्षाची पिल्लं परत केली.

ह्या संकट समयी आपल्या देशाला देखील आपला सल्ला नको साथ हवी आहे.

आज रोजी सरकारवर नुसती टीका करणारे नकोत तर समाजासोबत उभे राहून त्यांची सेवा करणाऱ्या लोकांची गरज आहे.

त्यामुळे दादांनो , सल्ले नकोत साथ द्या.  🙏

जेव्हा साथ देईल संपूर्ण भारत,
तेव्हा पुन्हा आनंदी होईल भारत....


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad