*साडी, पातळ, टाॅवेल-टोपी, फेटे-उपरणं, शाल ह्या आहेर प्रथा बन्द करा.*
सर्व बन्धु भगिनींनो !!! आपल्या समाजात असो किंवा दुसऱ्या कोणत्याही समाजात असो.....!!! ही प्रथा चांगलीच घर करून बसली आहे.लग्नात आहेर द्यावाच लागेल. लोकं काय म्हणतील ? चांगलं दिसत नाही..!!! आहेर म्हणजे 200 रूपयाची साड़ी, रुमाल (नेपकिन) टोपी-फेटे, शाली, उपरणे, या वस्तू *( यामध्ये 10 वा, 13 वा, वर्षश्राद्ध या दू:खद प्रसंगी आलेले कपडे सुद्धा असतात, अशी वस्त्रे शुभ/मंगल प्रसंगी वर्ज्य आहेत )* की ज्या कुणीही कधीच वापरत नाहीत.मग ती टोपी, शाल, फेटा, उपरणे यांचा खर्च सुमारे 300 रुपये. आपल्या समाजात लग्न, वास्तुशांती, सत्यनारायण पूजा किंवा अशाच कोणत्याही प्रसंगात कपड़े, साड़ी घेऊन जाण्याची प्रथा सर्वांनी आपआपल्या पासूनच बन्द करा व त्या प्रसंगी आयोजन कर्त्यास पुर्वी प्रमाणे रोख आहेर देण्याची प्रथा पाडावी. त्यामुळे आयोजन कर्त्यास व आपल्या समाजास फायदा होऊ शकेल.*आपण कोणत्याही प्रसंगी आहेर म्हणून 100, 200, 500, किंवा 1000 रु. ची कपडे,ड्रेस किंवा साड़ी मोठ्या प्रेमाने देतो. परंतु ते कपड़े कुणीही वापरत नाहीत.**आहेर स्विकारणारे हे कपडे पेट्या किंवा कपाट भरुन ठेवतात व पुढच्या प्रसंगी लेनदेन मध्ये तेच कपड़े व साड्या खपवतात. याप्रकारे समय व पैशाची बरबादी शिवाय काहीच मिळत नाही कोणालाही.* *जर आपण कपड़े, साडी या ऐवजी रोख आहेर दिले तर लग्न किवा कार्यक्रम करणाऱ्याला ती रक्कम उपयोगी होईल व त्यांना एक प्रकारे मदत केल्यासारखे होईल.* आज आपल्या समाजात बरेचसे गरीब परिवार आहेत. त्यांना तर बराच फायदा होईल. आपल्या समाजात लग्न प्रसंगी अंदाजे 900 ते 1000 पाहुणे येतात आणि जर सर्वांनी कपडे घेण्याऐवजी फक्त 50, 100, 200 ₹ दिल्यास लाखभर रूपये सहज जमतील. आता आपणच सांगा की आयोजन कर्त्यास त्वरित किती मदत मिळेल व तो पैसा लगेच त्यांच्या कामी येऊ शकेल. त्यामुळे आपल्या समाजात कुणालाही लग्नप्रसंगी पैशाची अड़चण असल्यास ती दूर होईल. तिच रक्कम जर आपण साड़ी किंवा कपड्यांच्या दुकानात देऊन व्यापा-यांचा गल्ला भरला तर....????? ती रक्कम समाजाचेच लोकांनी वापरली तर समाजाचा पैसा समाजातच राहिल व गरीब परिवार कर्जातून मुक्त होईल. आपल्या समाजातील महानुभावांना अनुरोध आहे,खास करून महिलांना.....!!!की ही प्रथा तुरंत बंद करा. आपल्या घरापासूनच याची सुरुवात करू या.....!!! आपल्या घरी लग्नप्रसंग, वास्तूशांती, सत्यनारायण पूजा असे कार्यक्रम असल्यास आपण आमंत्रण पत्रिकेत खाली एक लाइन जरूर लिहा, *कोणत्याही प्रकारचे ( साड़ी कपड्यांचे, भांड्यांचे ) आहेर स्वीकारले जाणार नाहीत* त्यानंतर कुणी कपड़े अथवा साड़ी आणल्यास ती प्रेमाने परत करा. घेऊ नका. आहेर प्रथा बन्द करण्यात समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी़ं समाज प्रबोधन करुन मदत करावी. सर्वांनी आपल्यापासूनच कपडे भांडे यांचे आहेर प्रथा बन्द करुन सुरुवात करावी. *लोकं काय म्हणतील ? भाऊबंदांचे नाकावर टिच्चुन लग्न झालं पाहिजे असा बाऊ करुन आपण जो अवास्तव खर्च करून कर्ज फेडण्यासाठीच आयुष्य घालवतो, त्याला आळा घालण्यासाठी पुढाकार घ्या. आपले निर्णय आपण स्वतः घ्या.* 🙏🙏🙏🙏🙏🙏 हा एक छान उपक्रम आहे सर्वांना फॉरवर्ड करा आणि *आपण ही नक्की ठराव कपड्याचा आहेर आज पासुन देणार नाही*👍👍👍👍👍👏👏👏