Type Here to Get Search Results !

यालाच जीवन म्हणतात...

0

 बर्याच वेळा आपल्याला असे वाटते कि,

जगात मलाच जास्त दुःख आहे...

हे दुःख, हा ञास माझ्याच वाट्याला का?

हे भोग मलाच का भोगावे लागतात...

अशा लोकांसाठी 

एक सहल...

एक दिवसाची...

.

.

सकाळी लवकर उठा

आणि बाहेर फिरायला जा...

तुम्हाला काही मान्यवर मंडळी 

पळताना दिसतील 

त्यांना विचारा

का पळताय...

तर 

पोट कमी करायला...

कारण अनेक आजार झालेत म्हणून...


यानंतर 

शेजारच्या एखाद्या हाँस्पिटल मधे जा...

तिथे गरीब श्रीमंत 

पडलेल्या चेहरा करून बसलेले दिसतील...


यानंतर 

मंदीरात जा...

जाताना गरीब भिकारी तुमच्या कडे भिक मागतील

आणि मंदिरात श्रीमंत भिकारी देवाकडे भिक 

मागताना दिसतील...


यानंतर 

रेशनिंग, बील, फी भरणार्याच्या रांगा बघा...

पैसा असूनही काही तरी घेण्यासाठी 

आसुसलेले लोक दिसतील...


यानंतर 

एखाद्या अनाथाश्रमात जा...

लहानपणीच जवळचे सोडून गेल्याने

प्रेमासाठी भुकेले चेहरे दिसतील...


यानंतर 

अपंगाच्या आश्रमात जा...

स्वतःचा एखादा अवयव शिवाय

जगणारे भेटतील...


यानंतर 

घरी या...


आणि 

शांतपणे विचार करा...

.

.

.

माझे दुःख मोठे आहे का आज दिवसभर भेटलेल्या लोकांचे...

.

.

.

आणि 

राञी दुसऱ्याचे दुःख पाहून 

तुम्हाला झोप येणार नाही...

मग लक्षात येईल

त्यांच्या दुःखात तुम्ही तुमच दुःख 

विसरून गेलाय...

.

.

.

आपल्यापेक्षा जगात हजारो पटीने 

दुःख भोगणारे

आणि 

तरीही जगणारे 

लोक आहेत...

.

पण तरीही आपले दुःख मोठे वाटते

कारण 

ते आपल्याला भोगावे लागते...


.

आपल्या दुःखाचा, संकटाचा बाऊ करू नका

कारण 

ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही...


म्हणून 

हसत जगा...

आणि 

दुसऱ्याला हसवा... यालाच जीवन म्हणतात...

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad