एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की,
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत".
नवरा म्हणतो साबण संपला असेल.
दुसर्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की,
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत"
कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.
नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते.
एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्याला म्हणते
"अहो ऐकलंत का?
समोरच्या वहिनी सुधारल्या.
त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते.
आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत"
तेवढयात नवरा बोलतो
"राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या.
काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात.
*समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते. परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती.*
*समोरचे नाही तर आपणच सुधारलोय.*
*तात्पर्य.......*
*आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्याकडे पाहिले पाहिजे.*
नेहमी नजर चांगली ठेवा,
जग खुप सुंदर आहे.
"मातीने" एकी केली तर विट बनते..,
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते..,
आणि........
जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का...❔🍂 .
*"विचार" असे मांडा की ,*
*तुमच्या विचारांवर कुणीतरी*
.
*"विचार" केलाच पाहिजे*
🙏🙏
*सोशल मिडीयाचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांच्या आचरणात आणि विचारात परिवर्तन करण्यासाठी करा.*
🙏🙏