Type Here to Get Search Results !

तो सध्या काय करतो ?

0

 *तो सध्या काय करतो ?* 😳🤫🤭

            *हे काय विचारणं झालं , तो फुल्ल बिझी असतो .* 

    *सकाळी नऊला उठतो ,कडक पाण्यानी आंघोळ करतो* 

 *देव्हार्यातल्या देवांच्या पाया पडतो , भुवईच्या बरोब्बर मधे कुंकू नायतर भगवा टिळा लावतो ,*  *हातात तांब्याचं कडं घालतो , कडक ओपन शर्ट आणी मळकी जीन घालतो  घरातला नाष्टा त्याला चालत नाय .* 

 *त्याला चौकातल्या अन्नाची मिसळ लागती .* 

        *आईकडुन १०० ची नोट घेतो ,  येवढ्यात काय होनार ? आजुन एका नोटेसाठी हुज्जत घालतो ,*  *🏍️गाडीत ५० च पॕट्रोल टाकतो* 



 *मग  थाटात एक पौष्टिक तर्रीवाली  मिसळ चार पाव खातो .*  *मग स्वामींच्या मठात जातो , तिथल्या उंबराला ३ फेर्या मारतो . मग चौकात येऊन गन्या , सुन्या  , पकया ला फोन लावतो .* 

           *ते आल्यावर भाऊंच्या आॕफीसमधे जाऊन पेपर मधल्या कालच्या टोळी राड्याच्या , राॕबरीच्या , देशातल्या कुठल्याशा भागातल्या हिंदू मुस्लीम दंग्याच्या , बलात्काराच्या बातम्या वाचतो .* 

              *भाऊच्या भागातल्या लोकांची आधारकार्ड , दवाखाना चिठ्ठीची कामं करतो .* 

              *असाच इकडं तिकडं टाइमपास करुन दुपारी जेवायला घरी येतो . त्या घरच्या भाज्या आवडत नाय . मग चिडचीड करतो .* 

             *पंखा लाऊन छान ताणुन देतो . आई बाप आणी लग्नाची तरुण बहीण कामाला गेलेले असतात . हा निवांत असतो .* 

 *चार वाजता उठुन आवरुन परत चौकात त्या आयटमची वाट पहात उभा रहातो , तोवर आंड्या र्हावल्या गन्या आलेलेच असतात .* 

 *शाळेच्या वर्गातली मृण्मई ग्रॕज्युएशन संपवुन कुठल्यातरी कंपनीत नोकरीला लागलेली असते .* 

    *१० / १२ वी त गणित इंग्लीश मधे गचकल्यावर याने शिक्षणाकडे  कायमची पाठचं फिरवलेली असते ,* 

              *संध्याकाळी पक्षाच्या पाडवा दसरा  मेळाव्याच्या तयारित व्यस्त होतो , झेंड्याची मोजणी आणी ठिकाणांच्या जागा ठरवतो ,  मेळाव्यात " ए आव्वाज कुणाच्चा " अशी गगनभेदी घोषणा घोकतो .   मंडळात IPL च्या मॕचवर  काॕटरच्या पैजा लावतो .* 

   *रात्री भुर्जीच्या गाडीवर काॕटर , बाॕइल . भुर्जीची शाही पार्टी झोडतो .* 

             *उशिरा गपचुप दार उघडुन घरात आल्यावर आई फादरनी जाब विचारलाच तर थेट धाऊन जातो अंगावर ,* 

       *गावाकडचीजमिन कधी विकणार ? मला कॕब घ्यायचीय टुरिस्टच्या धंद्याला ,  आमच्या साठी काय केलं तुमी  ? असा प्रश्न विचारून त्यांच्याशी हमरीतुमरी करतो  , बहीणीच्या पर्समधे हात घालुन मिळेल ती नोट खिशात घालतो . आणी बेडवर बिनघोर झोपुन जातो .* 

           *दोस्ती खातर अंगावर केस घेतो , पोलीस चौकी न कोर्टाच्या चकरा मारतो . तो दोस्तीच्या दुनियेतला राजा असतो ! वाढदिवसाच्या फ्लेक्सवरच्या १०/१२ जणांसोबत झळकतो .* 

          *दहीहंडी , गणपती , दत्त , हनुमान जयंतीत याचा पुढाकार असतो , कोविड काळात हा गरजुंच्या घरी भाऊंनी पाठवलेली किट वाटतो . स्वतः च्या घरासाठी असलं काही घेण त्याच्या इज्जतीत बसत नाय .* 

       *कधीतरी ओला उबेरवर बदली ड्रायव्हींग करतो आणी सगळेच उपाय संपल्यावर भाऊचे इलेक्शन संपल्यावर हा झुमॕटो , स्वीगीची पार्सलं पोचवतो , तोवर हा ३० पार झालेला असतो किडनीचा विकार जडलेला असतो .* 



            *याच्या तारुण्याचा जोश संपून तो अगतीक आयुष्य ढकलत असतो .* 😆🥱

         *...तो सध्या असाच असतो .* 🙏🏻

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad