Type Here to Get Search Results !

Ashadhi Ekadashi | एकादशी चे आध्यात्मिक रहस्य

0

 एकादशी चे आध्यात्मिक रहस्य :- 



उद्या रविवार दि. 10 जुलै रोजी आषाढी ( देवशयनी) एकादशी आहे . संपूर्ण भारत वर्षात या दिवशी उपवास करुन भगवंताचे नाम स्मरण केले जाते . 


या निमित्ताने थोडे एकादशी पाठीमागील आध्यात्मिक रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करुया .


चंद्राच्या रोजच्या गती मुळे रोज एक तिथी येते . 

प्रत्येक महिन्यात दोन पक्ष व प्रत्येक पक्षात  15 तिथी येत असतात . 

त्यापैकी 11 व्या  तिथीला  एकादशी म्हटली जाते . एकादश म्हणजे 11 . 


महिन्यातून दोन वेळा एकादशी तिथी येते .

कृष्ण पक्ष एकादशी व शुक्ल पक्ष एकादशी .


मनुष्य शरीरात मन ,शरीर व आत्मा असे चेतनेचे  तीन प्रमुख स्तर आहेत . 

तसेच मनुष्य शरीरात सप्तचक्र आहेत .


 सहस्त्रार हे सर्वोच्च चक्र आहे ते सोडून सहा चक्रे उरतात . मूलाधार ,  

स्वाधिष्ठान , मणिपूर , अनाहत , विशुद्धी व आज्ञा अशी षटचक्रे आहेत .


मन या चक्रातुन सदैव फिरत असते .

आध्यात्म व ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो . 

पुरुषसूक्तात म्हणूनच म्हटले आहे कि 

" चंद्रमा मनसो जात: " 


एकादशी च्या दिवशी मन हे आज्ञा चक्र व अनाहत चक्र यात स्थिर रहात असते . 

ही दोन्ही चक्रे चंद्राच्या गतीच्या प्रभावखाली असतात . या दोन चक्रात मन स्थिर राहणे स्वाभाविक सोपे असते  कारण या दोन चक्रावर चंद्राचा जास्त प्रभाव असतो म्हणून योग व आध्यात्म मार्गावर देवता किंवा गुरु यांचे ध्यान किंवा निर्गुण ध्यान करताना आज्ञा चक्र किंवा अनाहत चक्रावर करतात . 


आणि एकादशी च्या दिवशी मन या दोन चक्रावर आपोआप सहजपणे स्थिर होत असते ज्यामुळे ध्यान केंद्रित करणे सोपे जाते . 


उपवास म्हणजे लंघन केल्यामुळे शरीरात metabolism कमी होते . अन्न पचन करण्यासाठी शरीराची सर्वात जास्त उर्जा खर्च होत असते . अन्न पचन होण्यासाठी मेंदू आपल्या शरीरातील अन्य अवयवांची  सर्व उर्जा पचन संस्था कडे वळवतो . त्यामुळे खुप जास्त पोटभर जेवल्यावर पोट जड झाल्यासारखे होते व आपल्याला झोप आल्यासारखे वाटते कारण खुप जेवल्यामुळे पचन संस्था वर ताण येवुन मेंदू झोपेची आज्ञा देतो व झोपल्यामुळे इतर अवयव शांत होतात व पूर्ण उर्जा पचन संस्था कडे वळवण्यात येते .

तर उपवास केल्यामुळे ही उर्जा पचन संस्था साठी अतिरिक्त खर्च न होता शरीरात सर्व अवयवां साठी समान खर्च केली जाते . त्यामुळे शरीर हे active झालेल्या मनाला support करते आध्यात्मिक उन्नतीसाठी . 


एकादशी च्या दिवशी मन हे आज्ञा चक्र  व अनाहत चक्रात स्थिर आपोआप होते व त्या दिवशी च्या उपवासामुळे शरीर पण अन्नपचनासाठी अतिरिक्त उर्जा खर्च करत नाही व शरीर  शिथिल पडत नाही .त्यामुळे शरीर व मन active mode मधे असल्याने आत्मा active होतो . व आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत होते . या अवस्थेत जेव्हा आपण काही आध्यात्मिक साधना करतो तेव्हा शरीर मन व आत्मा यांचा balance होवुन आध्यात्मिक उन्नतीसाठी आध्यात्मिक उर्जा तयार होण्याची क्रिया सोपी होते .


शुक्ल पक्षातील एकादशी ला मन आज्ञा चक्रात स्थिर होते तर कृष्ण पक्ष एकादशी ला अनाहत चक्रात स्थिर होते .

त्यामुळे या दोन दिवशी ध्यान धारणा साधना करण्यासाठी मन आपोआप स्थिर व्हायला मदत होते . 


पुराणात याविषयी एक कथा सांगितली जाते . 

कृत युगात मूर नावाचा राक्षस होवुन गेला ज्याने देव व ऋषी मुनी यांना खुप त्रास दिला . देवराज इंद्र मग भगवान विष्णु यांना शरण गेले . भगवान विष्णु यांनी 1000 वर्ष मूर राक्षसाशी युद्ध केले . युद्ध करताना भगवान विष्णु विश्राम करण्यासाठी बदरिकाश्रमात सिंहावती गुफेत पहुडले . त्यावेळी मूर दैत्य पण त्यांच्या मागे तेथे आला व त्यांना मारण्यासाठी त्याने तलवार उगारली . त्यावेळी भगवान विष्णु यांच्या शरीरातून एक तेजोमयी कुमारी अवतीर्ण झाली जिच्या हातात आयुधे होती . तिने मूर दैत्यास युद्धासाठी आव्हान दिले . हुंकार करुन तिने मूर दैत्यास ठार मारले व क्षणात  भस्मसात केले . भगवान विष्णु यामुळे प्रसन्न झाले व त्या देवीस त्यांनी एकादशी हे नाव प्रदान केले . कारण तो 11 वा दिवस किंवा तिथी होती . 


आता येथे कथेमागील logic चा विचार करावा .. 

सांख्य तंत्रा नुसार आपले शरीर 25 तत्वांनी बनले आहे . पंचविंशति तत्त्व . मूर दैत्य हा त्यांचे  प्रतिक आहे . वर्ण मालेत क ट त प यादि अंकशास्त्रा नुसार 

मू :- 5 ( प फ ब भ म या क्रमानुसार ) 

र :-  2 ( य र ल व या क्रमानुसार ) 

असे अंक प्राप्त होतात .

म्हणजे 2 & 5 = 25 

म्हणजे मूर दैत्याचा नाश म्हणजे materialistic worldy matter पासून  detachment  जे मोक्षाकडे घेवुन जाईल . ( ultimate blissful state ) 

ही अवस्था प्रात करण्यासाठी जे ज्ञान प्राप्त करावे लागेल त्यासाठी मनावर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे कारण मन खुप चंचल आहे ते सहजासहजी ताब्यात येत नाही . 

मग त्यासाठी एकादशी चा उपयोग करावा  . एकादशी ने च मूर दैत्याचा नाश केला होता . म्हणजे एकादशी च्या दिवशी उपवास करुन आध्यात्मिक साधना केल्यास भवपाश पासुन मुक्त होवुन मोक्षाकडे वाटचाल सोपी होते .

एकादशी देवीने हुंकार करुन मूर दैत्यास ठार केले . 

हे  "  हुं " बीज मंत्र मूलाधार व मणिपूर चक्र जागृती साठी अत्यंत लाभदायक आहे . 

तसेच आपण " विठ्ठल विठ्ठल " असे सतत  जप करत गेल्यास त्या vibrations चा  मणिपूर चक्रावर  ( नाभी चक्र ) प्रभाव पडतो . हे अनुभवून पहा .


एकादश म्हणजे 11 . आपले 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिये व मन असे एकूण 11 इंद्रिये झाली . या 11 म्हणजे एकादश इंद्रियां वर ताबा मिळवणे यासाठी एकादशी तिथी सर्वात उत्तम असते . 

यादिवशी  फलाहार किंवा दूध किंवा  सात्विक  अल्पोपहार वगैरे घ्यावे . 


पृथ्वीवर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव पडत असतो .  पृथ्वीचा centrifugal force व चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल ( gravitational force ) त्यामुळे पृथ्वीवर समुद्राला भरती ओहटी येत असते . जेव्हा पृथ्वीवरील समुद्राचे पाणी चंद्राने ओढल्यामुळे चंद्राच्या दिशेने उचंबळते त्याच वेळी चंद्र ही पृथ्वीला आपल्या कडे खेचतो . 

पौर्णिमा व अमावास्येला समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते . त्याच प्रमाणे अष्टमी ला समुद्राला भरती येत असते . 

मनुष्य शरीरात पण पाण्याचे प्रमाण आहे त्यावर देखील चंद्राच्या या गुरुत्वाकर्षण चा प्रभाव पडतो . या काळात चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येत असतो . 


ज्योतिष व आध्यात्म नुसार चंद्र मनाचा कारक आहे त्यामुळे या काळात भावनिक  आंदोलने वाढतात या काळात .चंद्राचा  मनावर प्रभाव वाढतो . 


आपण जे अन्न खातो ते पूर्ण पणे पचून मेंदू पर्यंत त्याची उर्जा पोहोचायला 3-4 दिवस लागतात . त्यामुळे अमावस्या पौर्णिमा यांच्या 3-4 दिवस आधी म्हणजे एकादशी  व अष्टमी च्या 4 दिवस आधी म्हणजे चतुर्थी ला ( संकष्टी चतुर्थी ) जर आपल्या उपवास केला किंवा अल्पाहार सात्विक आहार घेतला तर अन्नाच्या माध्यमातून मेंदू पर्यंत पोहोचणारी अमावस्या पौर्णिमा व अष्टमी ला सुद्धा  सात्विक  व सकारात्मक राहते .


आध्यात्मिक दृष्टीने पाहता एकादशी ते पंचमी तिथी या काळात चंद्राचा आपल्या पचन संस्था वर जास्त प्रभाव असतो . पचन संस्था बिघडली तर मेंदूच्या कार्यक्षमता वर परिणाम होतो . त्यामुळे विचार प्रक्रिया,  निर्णय क्षमता व भावनिकता यावर परिणाम होतो . 

त्यामुळे एकादशी ला लंघन उपवास किंवा सात्विक अल्पोपहार घेतल्यास पचन संस्था सुरळीतपणे कार्य करते .आणि मेंदू पण पूर्ण कार्यक्षम होवुन काम करतो . 


एकादशी ला पृथ्वीवरील atmospheric pressure हे lowest असते त्यामुळे त्या दिवशी केलेला उपवास हा शरीरातील toxins बाहेर टाकुन cleansing साठी उपयोगी ठरतो . ज्या दिवशी high atmospheric pressure असते त्यादिवशी उपवास केल्यास शरीरास पूरक नसते . त्यामुळे द्वादशीला पारणे सोडून भरपूर खातात . महिन्यातून कमीतकमी दोन  वेळा लंघन उपवास केल्यास शरीराची detoxification process ( विषारी पदार्थ बाहेर फेकणे ) सुलभ होते व शरीर निरोगी राहते . सत्त्व रज तम या त्रिगुणापैकी शरीरास सत्त्व गुण जास्त लाभदायी आहे मग ते अन्नाच्या माध्यमातून असेल किंवा विचारांच्या माध्यमातून असेल . 

एकादशी ला ब्रह्मांडातील सत्त्व गुण / सात्विक लहरी जास्त प्रमाणात वाढलेल्या असतात . 

म्हणून एकादशी ला उपवास करुन किंवा अल्प प्रमाणात सात्विक आहार घेवुन व आध्यात्मिक साधना पूजन मंत्र जप स्तोत्र पाठ नाम स्मरण इ. माध्यमातून या सात्विक लहरी आपण आकर्षित करुन घेतो ज्यामुळे आपली आध्यात्मिक पातळी उंचावते . 


स्त्रियांच्या शरीरात जल तत्त्व जास्त प्रमाणात असते  व स्त्रियांच्या मासिक पाळी वर ज्योतिष दृष्टीने चंद्राचा प्रभाव असतो म्हणून एका विशिष्ट नक्षत्रावर पाळी परत येत असते दर 27-28 दिवसांनी . त्यामुळे अमावस्या पौर्णिमा अष्टमी ला चंद्राच्या पृथ्वीवरील जल तत्त्वावर जो सूक्ष्म परिणाम होत असतो तो स्त्रियांच्या शरीरावर जास्त होतो . म्हणून स्त्रियां साठी या उपवासाचे महत्त्व जास्त ठरते .


अशा प्रकारे एकादशी ला उपवास किंवा सात्विक अल्पोपहार  केल्याने शरीराचे detoxification होते . शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात . यामुळे आरोग्य सुधारते व आपोआप निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते . 


आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी ला देवशयनी एकादशी म्हणतात . या दिवसापासून चातुर्मास सुरु होतो . 

पावसाळ्यात रोगट हवामान असते व पचन संस्था कमजोर होते त्यामुळे या चातुर्मासात व्रत वैकल्ये जास्त असतात जेणेकरून आपली पचन संस्था सुरळीत रहावी . भगवान विष्णु आपल्या शरीरात नाभी चक्रात वास करुन असतात व हे चक्र पचन संस्था शी संबंधित आहे म्हणून चातुर्मासात भगवान विष्णु यांची उपासना जास्त असते .

आणि वर सांगितले तसे " विठ्ठल " हा शब्द भरभर उच्चारत गेला कि मणिपूर चक्रावर प्रभाव पडत जातो म्हणून विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या भक्तीचे नामस्मरणाचे एकादशी ला जास्त महत्त्व असते .


 या काळात सात्विक आहार उपवास यामुळे पचन संस्था सुरळीत राहते व मन पण स्थिर होते  . त्यामुळे आध्यात्मिक उन्नती गाठणे सुलभ जाते .


एकादशीला उपवास करावे किंवा ते शक्य नसेल हलका आहार फलाहार घ्यावा . श्रद्धापूर्वक अंत:करणाने  भगवान विष्णु यांचे पूजन, पुरुषसूक्त पाठ  किंवा स्तोत्र पाठ , विष्णु मंत्र जप , नाम स्मरण,  विष्णु सहस्त्रनाम पाठ करावा . " विठ्ठल विठ्ठल "  असे सतत नामस्मरण करत रहावे . 


इंद्रियां पासुन मन वळवले की ते भौतिक गोष्टी पासुन दूर होते व आध्यात्मिक उर्जा तयार होते . त्यामुळे 10 इंद्रिये व मन असे 11 तत्त्व ईश्वरी साधनेत गुंतवले की आध्यात्मिक उन्नती सुलभ होते . हेच एकादशी चे सार आहे व एकादशी तिथीला मन आज्ञा चक्र व अनाहत चक्रात आपोआप स्थिर होते त्यामुळे एकादशी तिथीचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे .


Thus Ekadashi is very important for purification of mind,  body and soul  . By doing fasting we clean all the toxins from the body . So the body will feel light and energetic and blissful . 


ॐ श्री विष्णवे नम: 

ॐ श्री विष्णवे नम: 

ॐ श्री विष्णवे नम:

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad