जंगलाचा राजा सिंह याने एक फर्मान काढले, आजच्या नंतर कोणीही निरक्षर राहणार नाही.. सर्व प्राण्यांनी आपली बाळे नवीन शाळेत टाकायचे. प्रत्येक प्राण्याला आपल्या मुलाला शाळेत पाठवावे लागेल. राजे साहेबांच्या शाळेत शिक्षित झाल्यावर सर्वांना प्रमाणपत्र वाटण्यात येईल. फर्मान जाहीर झाले.
सर्व प्राण्यांनी आपापली मुले शाळेत पाठवले. वाघाचे, उंट, जिराफ, हत्तीचे बाळ आले, माकड, मासे, ससा आणी कासवाची मुले ही आली.
शाळेत येऊन ऑगस्ट उजाडला अन प्रथम युनिट चाचणी परीक्षेतच हत्तीचे बाळ नापास झाले.
हत्तीने, बाईना विचारले, "आमचे बाळ कोणत्या विषयात नापास झाले...?"
"झाडावर चढण्यात अयशस्वी झाले." माकड वगळता सर्व प्राण्यांचे मुले या चाचणीत नापास झाले.
"आम्ही आता काय करू?"
"ट्यूशन घ्या, कोचिंगला पाठवा."
आता आपल्या मुलाला झाडावर चढण्यात अव्वल बनवणे हेच हत्तीच्या आयुष्याचे ध्येय बनले
सर्व प्राण्यांचे ध्येय साधारण असेच होते.
कसे तरी वर्ष सरले. अंतिम निकाल आला तेव्हा हत्ती, उंट, जिराफ, मासा,ससा सगळ्या प्राण्यांची बाळे नापास झाली, अपयशी ठरले.
माकडाचा वात्रट मुलगा पहिला आला. प्राचार्यांनी मंचावर बोलावून त्याला पदक दिले. माकडाने कोलांटउडी मारून आणि कलाबाजी दाखवून आनंद व्यक्त केला.
दुसरीकडे, अपमानित झाल्या सारखे वाटून हत्ती, उंट, जिराफ, ससा, मासा यांनी आपल्या मुलांना मारहाण केली.
नालायको, तुम्हाला एवढ्या महागड्या शाळेत टाकले, वर्षभर ट्यूशन आणि कोचिंगसाठी सर्व काही व्यवस्थित दिले, तरीही आजपर्यंत तुम्ही झाडावर चढायला शिकले नाही. शिका त्या माकडाच्या मुलाकडून .... काहीतरी शिका, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
पिटुकला मासा पोहण्यात पहिला आला, ससा धावण्यात पहिला आला, उंट लांब उडीत जिराफ उंच उडीत तर कासवाचे बाळ पोहण्यात पहिले आले होते, पण..... ते सारे बाकीच्या विषयात ती नापास झाले होते.
मासाच्या आईला मास्तरनी म्हणालि, "तुमच्या मुलीला हजेरीचा प्रॉब्लेम आहे."
माशाने मुलीला डोळे दाखवले.
मुलीने समजावण्याचा प्रयत्न केला, "आई, या शाळेत माझा जीव गुदमरतोय. मला इथे श्वासही घेता येत नाहीये. मला या शाळेत शिकायचे नाही. आमची शाळा तलावात असावी, नाही का?"
ही राजाची शाळा आहे, महागडी आहे. तुला तलावाच्या शाळेत पाठवून माझा अपमान होईल. समाजात माझा काहीसा मान आहे तो जप. या नवीन शाळेतच शिकावे लागेल. चला अभ्यासात लक्ष द्या.
हत्ती, उंट, जिराफ, कासव, त्यांच्या अयशस्वी मुलांना रागवत, मारहाण करत घेऊन जात होते.
वाटेत म्हाताऱ्या बन्याने विचारले, "मुलांना का रागावताहेत मारताय ?"
जिराफ म्हणाला हे सारे मुले , "झाडावर चढण्यात अयशस्वी झालेत..?"
म्हातारा वट सगळ्यांना बोलला, "पण या सर्वांना झाडावर कशाला चढायचे ?? करायचे ,काय यांना झाडावर चढून?"
तो हत्तीला म्हणाला, “तुझे सोंड वर कर आणि सर्वात उंच फळ तोड.
जिराफ तुम्ही तुमची लांब मान वर करून सर्वात वरची पाने तोडून खातात.
उंटानेही मान लांबवली आणि फळे आणि पाने खाऊ लागली.
झाडावर हत्तीचे बाळ चढून काय करणार, त्याला मातीत लोळू द्या..
माशांच्या पिलूला तलावातच शिकू द्या,
हत्तीच्या पिलू कडे पाहून म्हटले, या सर्व बाळांना बाळाला झाडावर चढवून त्याचा अपमान करू नका. जबरदस्तीने त्यांना अपयशी म्हणून लेबल लावू नका". ठीक आहे, माकडाच्या पिलाला प्रोत्साहन द्या, परंतु उर्वरित 34 मुलांना अक्षम, आळशी, निष्काळजी, अयशस्वी घोषित करू नका. मासे झाडावर चढू शकणार नाहीत, पण एक दिवस तो संपूर्ण समुद्र मोजेल. तसेच बाकीचे मुले आपल्या आवडत्या, निपुन असलेल्या क्षेत्रात एक दिवस अव्वल असतील
बोध👉🏻👉🏻
तुमच्या मुलांच्या क्षमता आणि कलागुणांचे कौतुक करा, मग ते अभ्यास, खेळ, नृत्य, गायन, फॅशन, शिवण, कला, अर्थ, खगोलशास्र, अभिनय, व्यवसाय, शेती, यांत्रिक, अशा कोणत्याही क्षेत्रात असो आणि त्यांना त्या दिशेने चांगले काम करू द्या. सर्व मुले अभ्यासात अव्वल असावीत असे नाही, फक्त त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आणि नैतिक मूल्ये रुजवणे आवश्यक आहे, ज्यातून मुले चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत.