एक महिला भेंडीची भाजी करण्यासाठी भेडी कापत असताना भेंडीच्या वरील बाजुला छिद्र पडलेले दिसले.
पण तिने ती फेकून न देता.
खराब झालेला तेवढाच भाग कापून फेकून दिला...
पुन्हा पाहिले असता अजून थोडा भाग खराब दिसला,
तिने तो भाग ही कापून फेकून दिला....
उरलेला भेंडीचा अर्धा भाग कापून भाजीत टाकला किती चांगली गोष्ट आहे, ५० पैशांची भेंडी आपण किती ध्यान देऊन कापतो
जो भाग खराब आहे तो कापून फेकून देतो... उरलेला भाग स्विकारतो.....
खुप चांगलं आहे हे.....
मात्र
दुःख या गोष्टीचं आहे की, आपण माणसांबाबत एवढे कठोर का वागतो...?
आपल्या जवळच्या एखाद्या माणसाबाबत एक चुक दिसली तर त्याच्या पुर्ण व्यक्तीमत्वाला आपण कापून फेकून देतो...
त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो....
आपण फक्त आपल्या अहंकारासाठी त्याच्यासोबतचे प्रत्येक नाते तोडतो....
मग एकच प्रश्न पडतो की, आपल्या जवळच्या माणसाची किंमत पन्नास पैशांच्या भेंडीपेक्षाही कमी आहे का...?
या छोट्याशा गोष्टीचा जरूर विचार करा...
आणि
आपल्या जवळच्या अमुल्य माणसांना लहान लहान चुकांसाठी जीवनातून वेगळे करु नका...
इतकंच...🌹🙏🏻🌹