Type Here to Get Search Results !

३६ आकडा आणि ६३ आकडा

0

३६ आकडा आणि ६३ आकडा

हे दोन अंक शिकवतात जिवनातील सत्य स्वरूप

३६ आकड्याचा *विचार* केला तर, *तीन* आणि *सहा* दोन्ही आकडे *एकमेकांकडे पहात* नाहीत. दोघेही टाईट पणाने *पाठीला पाठ* लावून उभी आहेत. एकमेकांचं *तोंडही* पहात नाहीत.


त्याप्रमाणे *माणसांच* असतं. छत्तीसचा आकडा हा *चाळिशीच्या* आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा *अहंकाराने*, *ताकदीने*, *पैशाने*, *परिपक्व* असल्यामुळे तो नेहमीच *अहंकारी* असतो. *कमीपणा* घेत नाही. मला *गरज* नाही, मी त्याचं *तोंड* पाहणार नाही, असे *शब्द* त्याच्या *तोंडात* असतात. सख्ये भाऊ *पक्के वैरी* होतात. आणि *हातात हात* न घेता *पाठीला पाठ* लावतात. 

     

आता *६३* आकडा पहा.

या आकड्याने *साठी* ओलांडल्या मुळे आता हे दोघेही *नम्र* झालेत. दोन्ही आकडे *एकमेकांकडे* पाहतात. हातात *हात* घेतात. एकमेकाला *आलिंगन* देतात. माणसाचं *असंच* असतं, एकदा साठी *ओलांडली* की, *नम्र* होतो. कारण ना *ताकद*, ना *तारुण्य*, ना *पैसा*, ना *सत्ता*, काहीच *राहत* नाही. म्हणून हा *नम्र* होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी *बालपण* विसरतो, *लग्न* झाल्यावर *आई वडिलांना* विसरतो, *मुलं* झाल्यावर *भावांना* विसरतो, *पैसा* आला की आपले *नातेवाईक* विसरतो, आणि *म्हातारपणी*, जेवढ्यांना *विसरला* होता त्यांची *आठवण* काढत बसतो. 


*६३ च्या* या आकड्या प्रमाणेच *संयम* राखणे हा *आयुष्यातला* फार मोठा *गुण* आहे. कारण एक चांगला *विचार* अनेक *वाईट* विचारांना *नाहीसा* करतो.    


 *वयाने* कोणी कितीही *लहान मोठा* असु देत. *वास्तवात* तोच मोठा असतो, ज्याच्या *मनात* सर्वासाठी *प्रेम*, *स्नेह* व *आदर* असतो. आयुष्यात तुमच्या *सगळ्या अडचणी* सोडवू शकेल अशी व्यक्ती *शोधू* नका. तर,, तुम्हाला *कोणत्याही अडचणीत* एकटे *सोडणार* नाही अशी *व्यक्ती* शोधा...!!  



*लेखक अनामिक*



🙏🙏

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad