अंजनगाव बारी परिसरातील ग्रामिण वासियांचे कुलदैवत भवानी माता मंदिर ३५० वर्षे पुरातन असून, या मंदिराला शासनाकडून 'क' दर्जा देण्यात आला आहे. नवरात्रात यावर्षीही नवरात्री उत्सवाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंजनगाव बारी, कोंडेश्वर, कौढण्यपुर या ठिकाणी जमीनीत भुयारी मार्ग होते. रुख्मीणीला कोंडेश्वर येथून अंजनगाव बारीच्या भवाणी मंदिरात श्रीकृष्णाने याच भुयारी मार्गाने आणण्यात आले होते अशी आख्यायिका आहे. या मंदिराला लागूनच महानुभव पंथाचे मंदिर असून, ही दोन्ही मंदिरे अगदी शेजारी असल्याने नवरात्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या परिसराला देवीचे महात्म्य लाभले असुन यामध्ये जय भवानी माता, तेलाई माता मंदिर, मरामाय माता मंदिर, दुर्गादेवी मंदिर, महालक्ष्मी व कालीमाता मंदिर, गंगा जमुना मंदिर, संतोषी माता मंदिर ही मंदिर बरीच पुरातण असुन या मंदिराचा शासनामार्फत कार्यकत्यांनी वेळेतच जिर्णोद्धार होत गेले. आता मात्र जिर्णोध्दाराचा कार्यक्रम लोकवर्गणीतून होत आहे. नवरात्री महोत्सवामध्ये याठिकाणी अखंड ज्योत प्रज्वलीत होते. येथे येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पुर्ण होत असल्याचे भाविकांमध्ये बोलल्या जाते. ९ दिवस चालणाऱ्या उत्सवात आरती, गोंधळ, भजणे, भागवत सप्ताह, किर्तन, भजन इ. कार्यक्रम होतात. तेलाई मातेच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून प्रत्येक मातेच्या मंदिर परिसरात रोशनाई केली आहे. पार्डी येथील गंगा जमुना देवीच्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरु झाले असून, हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
मालखेड (रेल्वे) येथील अंबादेवी एकमेव मंदिर परिसरातील संपुर्ण गावात प्रसिद्ध येथे अखंड ज्योत नऊ दिवस सतत प्रज्वलीत राहते. त्यामुळे येथे महाप्रसादाच्या वेळी हजारो भाविक आपली मनोकामना पुर्ण करण्याकरिता येतात. मरामाय मातेच्या मंदिर परिसरात घटस्थापना झाली असून मंदिर परिसर रोषणाईच्या झगमगाटाने गजबजला आहे. कोंडेश्वर येथील मातामय मंदिर १५० वर्षे पुरातण आहे. या मंदिरात दरवर्षी भक्तीमय वातावरण असते. या सर्व मंदिरात घटस्थापना होऊन ९ दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडतात यामुळे अंजनगाव बारी संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात दुमदुमले आहे
Maa
Ma
Nav
Navratri maa