Type Here to Get Search Results !

भारतातील पिनकोड सिस्टिम चा जनक ?

0

 *भारतातील पिनकोड सिस्टिम चा जनक कोकणातील 'राजापूर' मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस असेल याची आपल्याला पुसटशी कल्पना ही नसेल... त्यांचे नाव श्रीराम भिकाजी वेलणकर...*



       *PIN म्हणजे Postal Index Number... १९७२ पर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची... पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या... म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे... आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा.! चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच.!*

       *या सगळ्या अडचणीतून जात असताना त्यावर उपाय म्हणून पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली... पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली...*

       *पिनकोडची रचना अशी आहे... पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे... यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत... तर एक खास मिलिट्रीसाठी वापरला जातो... या मधील पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात... म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल...*


११, दिल्ली...*

१२ व १३, हरयाणा...*

१४ ते १६, पंजाब...*

१७, हिमाचल प्रदेश...*

१८ ते १९ जम्मू/काश्मिर...*

२० ते २८, उत्तर प्रदेश/उत्तराखंड...*

३० ते ३४ - राजस्थान...*

३६ ते ३९, गुजरात...*

४० ते ४४, महाराष्ट्र...*

४५ ते ४९ मध्य प्रदेश/छत्तीसगड...*

५० ते ५३, आंध्र प्रदेश...*

५६ ते ५९, कर्नाटक...*

६० ते ६४, तामिळनाडू...*

६७ ते ६९, केरळ...*

७० ते ७४, पश्चिम बंगाल...*

५५ ते ७७, ओरिसा...*

७८, आसाम...*

७९, पूर्वांचल...*

८० ते ८५ बिहार आणि झारखंड...*

९० ते ९९, आर्मी पोस्टल सर्व्हिस...*


       *म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक विभाग दाखवतो, दुसरा अंक उपविभाग, तिसरा अंक सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो...*

       *उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे... यात पहिला अंक दाखवतो पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे...*

       *आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही... ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांना मानाचा मुजरा.


"श्रीराम वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते!"...


लेखक, संकलक अज्ञात!!

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad