Type Here to Get Search Results !

Burnout का होतो?*

0

Occupational Burnout - बर्नआउट होऊ नका

"अतिव्यस्ततेमुळे येणारा तणाव"



आग तोपर्यंतच पेटती राहते जोपर्यंत जळून जाण्यासाठी त्यात कुठल्यातरी इंधनाची आहुती पडत राहते. एक वेळ अशी येते की इंधन संपून जाते आणि उरते ती फक्त राख.

Burnout ही संज्ञा शब्दशः नसली तरी मानसिक आणि शारीरिक पातळीवर अगदी अशाच पद्धतीने अनुभव होते.

शिक्षण पूर्ण झालं की स्वतः  निर्णय घेऊन किंवा नाईलाज म्हणून, आर्थिक, सामाजिक, मानसिक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण नोकरी-उद्योग-प्रवास इत्यादी सुरू करतो.आपण करत असलेले काम हे आपल्या स्व च्या कल्पनेशी इतकं जोडलेलं असतं की आयुष्याचा कायापालट दोन्ही चांगल्या आणि वाईट अर्थाने करायची क्षमता आपल्या कामाच्या स्वरूपात असत.

हळूहळू ह्यात आपली ध्येय, स्वप्न, ईर्षा, स्पर्धा, वाढत्या गरजा या गोष्टी कधी शिरकाव करतात ते आपल्याला कळत नाही आणि आपण फसतो एक भीषण अतिव्यस्ततेच्या चक्रव्यूहात!

या burnout चा एक महत्वाचा भाग म्हणजे कामातून मिळत असणारं समाधान, मी काहीतरी महत्वाचं योगदान देत आहे ही भावना, आणि आपली उत्पादनक्षमता (कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त केलेलं उत्तम दर्जाचं काम) या सर्वांवर होणारा दृश्य वाईट परिणाम!

दिवसेंदिवस येत असणारी अस्वस्थता, कामाचा वाढता आवाका, न संपणाऱ्या deadlines, मानसिक, शारीरिक आणि भावनिक थकवा, काम, संस्था आणि boss बद्दल वाटणारा राग,आपण अडकून पडलो आहोत असं वाटणं, अकार्यक्षमत्यामुळे येणारी अपराधी भावना या सगळ्या हळूहळू पण सतत होणाऱ्या अनुभवांना म्हटलं जातं burnout! अगदी टोकाच्या अवस्थेत हा burnout चा भस्मासुर नैराश्य, आत्महत्या, कौटुंबिक तणाव, आरोग्यावर बेसुमार दुष्परिणाम असं पण रूप घेऊ शकतो. हळूहळू आपण आपला उत्साह, हुरुप आणि आत्माच हरवून बसतो. अति शेवटी माती करते.


Burnout का होतो?


*-कर्मचाऱ्यांकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा आणि मागण्या. वाढतं काम, अपुरी साधनं, प्रवासाच्या आणि कामाच्या गैरसोयीच्या वेळा

*अपेक्षा पूर्ण करताना कर्मचार्यांकडे असणारे अपुरे कौशल्य, ऊर्जा आणि इच्छाशक्ती

*कुटुंब, संस्था आणि मित्र-नातेवाईकांकडून मिळणारा तोकडा सपोर्ट---कौतुकाचा अभाव आणि योग्य त्या वेळी न मिळालेलं पण, due असणार promotion, पगारवाढ इत्यादी

*व्यक्तीमध्ये बदलाला सामोरं जाण्याची तयारी नसणे, आपल्या मागण्या आणि आपली असमर्थता ठामपणे व्यक्त न करता येणं, तणाव आणि भावनांचं व्यवस्थापन करता न येणे

*अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्या जस की बेरोजगारी, गरिबी, वाढती लोकसंख्या, महागाई, कायमस्वरूपी काम मिळवण्यामधली असुरक्षितता, नवीन तंत्रज्ञानाचं आव्हान,उदासीन आणि अर्धवट पुस्तकी ज्ञान देणारी शिक्षणव्यवस्था इत्यादी


या burnout राक्षसापासून स्वतःला कसं वाचवायचं??

- स्वतःसाठी शांतता शोधा. जेव्हा आता बास अस वाटेल तेव्हा स्वतःला space द्या. मध्ये मध्ये कामातून ब्रेक घेत चला. विश्रांती घ्या, वेळेवर आणि छान जेवण करा, भरपूर पाणी प्या, व्यायामाला आयुष्याचा भाग बनवा. सहलीला जा. फोन आणि इतर स्क्रीन दूर ठेवा. कधीतरी स्वतःला priority द्या. 

- कधी कधी अगदी काहीच करू नका. मेंदूला सतत काहीतरी कामात गुंतवायलाच हवं असं अजिबात नाहीये. 

- तुमचे अनुभव लिहीत राहा. व्यक्त होण्याचा एक सुंदर पर्याय. 

- मित्र मैत्रिणींना भेटत राहा किंवा एकटे राहायला आवडत असेल तर तो वेळ स्वतःला नक्की द्या. 

- तुम्हाला आवडणाऱ्या आणि आयुष्य अर्थपूर्ण बनवणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा. कामाच्या पलीकडे स्वतःचे छंद आणि स्वतःची ओळख बनवा. 

- नाही म्हणायला शिका. काम आणि घर यात एक स्पष्ट रेषा आखून ठेवा. स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि अतिताण येईपर्यंत त्या ओलांडून  स्पर्धेतील अजून  एक अनोळखी चेहरा बानू नका.कुठे थांबलं पाहिजे हे कळलं की सहज होत बरंच काही.

- योग्य वेळी घरच्यांचा आणि वेळ आली तर मानसशास्त्रज्ञांचा, डॉक्टरांचा आधार घ्या. तुमच्या मानसिक आरोग्या पेक्षा काहीच मोलाचं नाही. 

- गरजा आणि कामना यात खूप फरक असतो. योग्य वेळी योग्य त्याची निवड करा. नवीन कौशल्य आत्मसात करा जी कामाच्या ठिकाणी उपयोगी येतील. सुदैवाने इंटरनेट अगदी फुकटात काही उत्तम कोर्सेस कमी वेळात शिकवू शकतो. आपले प्लस आणि मायनस नेहमी जोखून ठेवा आणि त्यात सतत update करत राहा. तणावाचे नियोजन आणि भावनांचे व्यवस्थापन काळाची गरज आहे. त्याला पर्याय नाही. 

- सतत व्यस्त असणं म्हणजे काहीतर खूप भारी या गैरसमजातून बाहेर या. तुमच्या व्यस्त असण्या किंवा नसण्याने जग थांबत नाही. 

- अगदी असह्य झालं तर कामाला स्वल्पविराम द्या, quitting is not always loosing, sometimes it is a beautiful medium for new and better beginnings. 


Burnout अगदी सुरवातीच्या  अवस्थेतच ओळखणं ही त्याला थांबवण्याची पहिली पायरी आहे. ह्या पोस्ट ने कदाचित तुम्हाला तो ओळखायला मदत केली तरी हा लेखनप्रपंच यशस्वी होईल. शुभेच्छा!*

संकलन - क्रांतीकुमार कडुलकर

🌸🌸🌸🌸🌸

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad