.*🌹"पितृअष्टक"*🌹.
*जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला*
*पुढे वारसा हा सदा वाढविला*
*अशा नम्र स्मरतो त्या पितरांना*
*नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना* || १ ||
*इथे मान सन्मान सारा मिळाला*
*पुढे मार्ग तो सदा दाखविला*
*कृपा हीच सारी केली तयांना*
*नमस्कार साष्टांग त्या* *पूर्वजांना* || २ ||
*मिळो सद् गती मज पितरांना*
*विनती हीच माझी त्रिदेवतांना*
*कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना*
*नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना* || ३ ||
*जोडून कर हे विनती तयांना*
*अग्नि वरूण वायु आदी देवतांना*
*सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना*!! ४!!
*वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना*
*सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना*
*मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना*
*नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना* || ५ ||
*करूनी सिध्दता भोजनाची तयांना*
*पक्वान्ने आवडीनें बनवून नाना*
*सदा तृप्ती होवो जोडी करांना*
*नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना* || ६ ||
*मनोभावे पुजूनी तिला, यवाने*
*विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने*
*आशिष द्याहो आम्हा सकलांना*
*नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना* || ७ ||
*सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा*
*न्यून काही राहाता माफी कराना*
*गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना*
*नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना* || ८