Type Here to Get Search Results !

अंजनगाव बारी येथील पुरातन देवी मंदिर जागृत देवस्थान || Historic temple in anjangaon bari

0

 अंजनगाव बारी येथील पुरातन देवी मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. जिल्ह्यासह बाहेरगावावरून भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षापासून येथे मोठ्या उत्साहात दुर्गोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी दहा सार्वजनिक मंडळात घटस्थापना करण्यात आली आहे. गावात पुरातना भवानी माता, तेलाई माता, मरामाय, मातामाय, राणामाय, आसरा माता, रामगीर महाराज, निदानजी महाराज इ. मंदिराचा समावेश आहे तर यापैकी भवानी माता, तेलाई माता व राणामाय ही ठिकाणे उल्लेखनीय असून पर्यटन स्थळांमध्ये याचा उल्लेख होतो.


भवानी माता मंदिर : हे मंदिर इ.स.१६ व्या शतकातील असून याठिकाणी लागूनच मुघलकालीन पक्‌या माती व फळ्यांमध्ये बांधलेली गढी आहे. या गढीमध्ये भुयार असून तो रस्ता तिर्थक्षेत्र कोंडेश्वरला जोडला जातो. या भागात छत्रपती शिवाजी महाराज नेहमी येत असल्याचेही बोलल्या जाते. त्यांच्याच उपस्थितत याठिकाणी भवानी मातेची स्थापना झाली असावी असा समज आहे.


तेलाई माता मंदिरा:- अंजनगाव बारी ते पार्डी (देवी) मार्गाला लागूनच एका भव्य वडाचे झाडाखाली शेकडो वर्षे पुरातण दगडावर तेलाई मातेची कलाकृती


करून त्याची स्थापना करण्यात आली होती. दिवसेंदिवस या ठिकाणच्या विकासाला गती येत गेली तर आज या ठिकाणी भव्य सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले. बाजुलाच शनि देवाची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्री उत्सवात दिव्यांची व लाईटांच्या रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघतो. राणा माय टेकडी :- या टेकडीचा इतिहास हा ख्रिस्त पूर्व कालखंडातील असून त्याकाळी कुणीतरी या ठिकाणी राणामायची स्थापना केली त्यावेळेपासून त्याठिकाणाला 'राणामाय टेकडी' हे नाव पडले. हजारो पर्यटक येथे हजेरी लावतात. याचबरोबर मरामाय,


मातामाय, आसरा माता, रामगीर महाराज देवस्थान, निंदानजी महाराज देवस्थान इ. मंदिरात घटस्थापनेचे आयोजन केल्या जाते. नऊ दिवस या सर्व ठिकाणी विविध नाट्यमय, भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. आरती, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad